Vision

१. आदिवासी समाजातील दुर्बल असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करणे.

२. समाजाच्या विविध प्रश्नासाठी आणि त्यावरील उपाय योजनेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.


३. समाजाचा सर्वांगीण विकास करणे.

Our Mission

सर्वतः आणि अंतिमतः समाज हा मोठा आहे आणि "उबंटू-समाज आहे म्हणून आपण आहोत" या भावनेतून:

१. १००% समाजकार्य , 0% राजकारण (100% Socialism, 0% Politics).

२. समाजाचा दर्जा उंचावणे, ठराविक व्यक्तीचा नाही (Uplift community, Not person).

३. समाजाने समाजाचा सर्वांगीण विकास करणे (Uplift community by community).

About us

एका मानववंशशास्त्रज्ञाने एका आफ्रिकन जमातीतील मुलांना एक खेळ सांगितला. त्याने एका झाडाजवळ फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि मुलांना सांगितलं की, जो तिथे सर्वात आधी पोहोचेल त्याला ती सर्व गोड फळं मिळतील. जेव्हा त्याने त्यांना पळायला सांगितलं तेव्हा ते सगळे एकमेकांचे हात हातात घेऊन एकत्र धावले आणि मग एकत्र बसून त्यांच्या ट्रीटचा आनंद लुटत बसले. जेव्हा त्याने त्यांना विचारले की, ते असे का धावले आहेत कारण जिंकणार्‍या कुणा एकासाठी ती सर्व फळे असू शकली असती त्यावर त्यांचे उत्तर होते “उबंटु” म्हणजे ‘मी आहे कारण आपण आहोत’; म्हणजेच ‘समाज आहे म्हणुन मी आहे’.
आदिवासी समाजातील व्यक्ती/संघटना यांना संघटित करून त्यांचा विचार, वेळ आणि पैसा यांचा समन्वय साधून, समाजऋण फेडणे (Pay Back to Society) या भावनेतून, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच शिक्षण (साक्षरता, सांस्कृतिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, रोजगार शिक्षण, सामाजिक मूल्य शिक्षण इ. ) रोजगार, आरोग्य व सामाजिक दर्जा यासंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वावलंबी समाज व्यवस्था निर्माण करणे.


आवाहन:

आपण या समाजव्यवस्थेचा भागहोण्यासाठी आर्थिक दृष्टीने सधन (दरमहा किमान 10,000/- उत्पन्न असणारे समाज बांधव) बांधवानी किमान 100/- रुपये किवा त्यापेक्षा अधिक ऐष्क्रिक रक्कम दर महिन्याला 'उबंटू- आदिवासी समाज संस्था' च्या बँक खात्यावर जमा करावी.